शिवदत्त ज्ञानप्रसारक मंडळाच्या क्रीडा बक्षीस समारंभाला अभिनेता हार्दिक जोशींची हजेरी



दिवा, (आरती परब) :  दिव्यातील श्री गणेश विद्यामंदिर, माय मदर इंग्लिश स्कूल आणि लीलावती ज्युनिअर कॉलेजने गेल्या महिन्यात म्हणजे २४ डिसेंबरल रोजी आयोजित केलेल्या कबड्डी, खो खो, रनिंग आणि इतर विविध क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आज मराठी सिरियल, चित्रपटातील गुणी अभिनेते हार्दिक जोशी शाळेत आले होते. संस्थेच्या अध्यक्षा लीलाबाई लक्ष्मण म्हात्रे, संस्थेचे सचिव साईनाथ लक्ष्मण म्हात्रे, केतकी साईनाथ म्हात्रे, दिनेश लक्ष्मण म्हात्रे, गीता दिनेश म्हात्रे आणि अनुप शिवदत्त म्हात्रे यांनी हार्दिक जोशी यांचा सत्कार केला. 


हार्दिक जोशी म्हणजेच सर्वांचा लाडका राणा दा यांनी बक्षीस वितरण करतांना शिक्षणा शिवाय पर्याय नाही तथा प्रथम आई आणि नंतर शाळेतील बाई असा कानमंत्र देतांनाच सर्वांगीण विकास करायचा असेल तर अभ्यासाबरोबर मैदानी खेळ सुद्धा आवश्यक असल्याच्या भावना विद्यार्थी आणि उपस्थितांना बोलून दाखविल्या. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देत असल्याच्या भावना  केतकी साईनाथ म्हात्रे यांनी मान्यवरांना समोर व्यक्त केल्या. त्यावेळी साईनाथ म्हात्रे म्हणाले, विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून त्यांच्या शाळा कॉलेजात नेहमीच विविध उपक्रम राबवित असतात आणि म्हणूनच पंचक्रोशीत या शाळा कॉलेजकडे अत्यंत आदराने पहिले जाते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग, पालक, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम चौधरी सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल भोईर सर आणि शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अतोनात मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post