दिवा, (आरती परब) : दिव्यात सकाळी चाळीत कचरा उचलण्यास आलेल्या कचरा घंटागाडीच्या चालकाने एका ८० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला फरफटत नेले. नंतर त्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारासाठी हॉस्पिटलला नेत असताना मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दिव्यात घडली.
दिव्यातील पूर्वेच्या संतोष नगर येथील सिताराम थोटम हे ८० वर्षाचे ज्येष्ठ नागरिक कचरा गाडी आल्यामुळे स्वतःच्या घरचा कचरा आणण्यासाठी पायी जात असताना घंटागाडीच्या चालकाने त्यांना जोरदार धडक देत फरफटत नेले. यात ज्येष्ठ नागरिकाचा उजवा पाय गुडघ्यात तुटला तर त्याच्या उजव्या बाजूच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर जखमा झाल्या. तेथे ज्येष्ठ नागरिकाला फटफटत नेत असताना त्या चालकाला नागरिकांना आरडाओरडा करत थांबण्यास सांगितले. तो चालक दोन सेकंद थांबून पुन्हा त्याने गाडी ५० ते १०० मीटर मागे नेत थांबविली. त्यामुळे ते ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले. त्यानंतर थोटम यांना उपचारासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला नेत असताना त्यांचा गाडीतच मृत्यू झाला. कळव्याच्या हॉस्पिटलला गेल्यावर डॉक्टरांनी थोटम यांना मृत घोषित केले. दरम्यान पोलिसांनी आरोपी मनोज कदम याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी करत आहेत. या अपघाताच्या घटनेबाबत नागरिकांतून चालकाविरोधात संताप व्यक्त होत आहे. या चालकाने याआधीही अजून दोन नागरिकांना गाडीने ठोकले असल्याचे नागरिक सांगतात. चालकाच्या निष्काळजीकपणामुळे थोटम यांना आपला जीव गमवावा लागल्याने नागरिकांनी आरोपीला पालिकेने कामावरुन काढून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

आमच्या समोर त्या गाडीच्या ड्रायव्हरने त्या आजोबांना फरफटत नेले. आम्ही सर्वजणांनी ओरडून गाडी थांबविण्याची विनंती केली मात्र त्या ड्रायव्हरच्या कानात हेडफोन असल्याने त्याला आवाज न गेल्याने त्याने पुन्हा गाडी मागे घेऊन गेला. त्यात त्या आजोबांचा पाय ही तुटला. त्यावेळी पोलिसांना कळवून देखील
पोलीस घटनास्थळी लवकर दाखल झाले नाही. अपघातानंतर नागरिकांनी त्या ड्रायव्हरला पकडून ठेवले होते. याप्रकरणी नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्या ड्रायव्हरला ताब्यात घेतले. पोलीस प्रशासन याबाबत कारवाई करण्यात टाळाटाळ करत असल्याचे पहावयास मिळाले.
दहा लाखाची आर्थिक मदत जाहीर करावी
जखमी थोटम यांना रुग्णालयात घेऊन गेले असता त्यांना तिथे मृत घोषित करण्यात आल्यामुळे त्या घंटागाडी ड्रायव्हरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पालिका प्रशासनाने सिताराम थोटम यांच्या घरवाल्यांना तात्काळ दहा लाखाची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे.