वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन




कोल्हापूर, ( शेखर धोंगडे ) : शिवाजी विद्यापीठ आणि किर्लोस्कर उद्योग समुहातर्फे आयोजित वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सकाळच्या सत्रात वनस्पती उद्यानास भेटी देण्यात आली. त्यामध्ये वनस्पतीशास्त्र विभागातील पी. एच. डी.विद्यार्थी अजिंक्य, युगंधरा,दयानंद यांनी उद्यानातील वनस्पतीची ओळख व महत्व सांगितले. विविध विभागातील विद्यालयातील आणि पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. 


त्यानंतर मानवशास्त्र विभागातील सभागृहात पर्यावरण संबंधित चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता पुरस्कार वितरणाने झाली. अध्यक्षस्थनी प्र. कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील होते. प्रा. डॉ. एस. आर यादव यांना वसुंधरा सन्मान तर प्रा.डॉ. अनीलराज जगदाळे याना वसुंधरा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबरोबर देवगड कॉलेजचे प्रा. नागेश दप्तरदार, अमोल बुद्धे यांना वसुंधरा मित्र व संपूर्ण अर्थ लाईव्हलिहूड फाऊंडेशन यांना वसुंधरा मित्र पुरस्कार प्रमुख उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


तसेच महोत्सव दरम्यान आयोजित केलेल्या फोटोग्राफी व रील्स स्पर्धेमधील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ. पी. एस. पाटील म्हणाले की, लोकसंख्या वाढ व नैसर्गिक संपत्ती याचा मेळ घालणे गरजेचे आहे.अन्यथा आपल्याला भविष्यात नवनवीन प्रश्नांना तोंड दयावे लागेल. प्रदूषण असेच होत राहिले तर आपल्या पुढच्या पिढीला गोळ्यांच्या रुपात पाणी घ्यावे लागेल.  त्यामुळे वेळ न घालवता शाश्वत विकासाकडे भर देणे गरजेचे आहे. यासाठी स्वतःमध्ये बदल घडवूण आणने गरजेचे आहे. तसेच किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाद्वारे पर्यावरणामध्ये काम करणा-यांना मिळणारा पुरस्कार हा इतरांनाही प्रेरणा देतो. असे डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी किर्लोस्कर समूहाचे विरेंद्र चित्राव, मकरंद जोशी, सुरेश मगदूम, हरीश सैवे व पर्यावरण शास्त्र विभागांच्या विभाग प्रमुख डॉ. आसावरी जाधव , डॉ पल्लवी भोसले, डॉ. रचना इंगवले आदी उपस्थित होते. डॉ. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले. शरद आजगेकर यांनी मानपत्राचे वाचन आणि आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post