दिवा, (आरती परब) सद्गुरु कृपा कंस्ट्रक्शन आणि श्लोक अपार्टमेंट आयोजित श्री सत्यनारायण महापुजेनिमित्त २० X २० डबलबारी भजनाचा जंगी सामना दिव्यात काल गाजला. बुवा संतोष दत्ताराम जोईल आणि बुवा संदिप लोके या दोन बुवांमधील डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याला चाकरमान्यांनी तुफान गर्दी केली होती. हा भजनाचा जंगी सामना चार ते पाच तास रंगला
दिव्यात अशा डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याचा चाकरमानी अतुरतेने वाट पाहत असतात. हा कार्यक्रम सद्गुरु कृपा कंस्ट्रक्शनचे मालक उमेश पाटील व श्लोक अपार्टमेंटमधील वैभव जाधव, स्वप्नील मेस्त्री यांनी आयोजित केला होता. या भजनाच्या जंगी सामनाल दानवी वैभव जाधव या अकरा वर्षांच्या लहान मुलीने पखवाज वाजवून श्रोत्यांची वाहवाह मिळवली. यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक अमर पाटील आणि दीपक जाधव यांचा सत्कार आयोजक उमेश पाटील यांनी केला. या कार्यक्रमाला दिडशे दोनशे चाकरमान्यांनी हजेरी लावली होती.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)