कोल्हापुर जिल्हा रहिवासी सेवा संस्था व ताराराणी फाऊंडेशनचा उपक्रम
दिवा, (आरती परब) : कोल्हापूर जिल्हा रहिवासी सेवा संस्था व ताराराणी फाऊंडेशन प्रणित महिला बचत गट आयोजित दिनदर्शिका २०२५ प्रकाशन सोहळा रविवार ५ जानेवारी २०२५ रोजी शिवम प्लाझा हाँल, मुंब्रादेवी काँलनी रोड, दिवा पूर्व येथे उत्साहात पार पडला.
प्रमुख पाहुणे संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त ठामपा, संजय बापट, पत्रकार, दयानंद गुडंप, कर्मिक अधिकारी आस्थापना ठामपा, एस. डी. पाटील (काका), संस्थापक कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सेवा संस्था, अविनाश पवार, संस्थापक, भारतीय मराठा संघ यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
तसेच कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सेवा संस्थेचे अध्यक्ष अमोल रेडेकर, उपाध्यक्ष अशोक गजरकर, धनाजी साळोखे, सचिव एकनाथ देसाई, उपसचिव संदीप पाटील, खजिनदार कृष्णा पाटील, उप खजिनदार शिवाजी वापिलकर, कार्याध्यक्ष तुषार पाटील, उपकार्याध्यक्ष मारुती पाटील, शरद पाटील, सल्लागार भरत शिंत्रे, दिलिप लटके, संचालक प्रकाश पाटील, नामदेव पाटील, मारुती जाधव, धनाजी पोवार, अरुणा मस्कर ताराराणी फाऊंडेशन अध्यक्षा यांनी विशेष मेहनत घेतली.

