दिवा, (आरती परब) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष व तन्वी फाऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य कार्डचे ७६ व्या प्रजासत्ताक दिनी वाटप करून पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम शिवसेना उबाठा गटाचे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, महिला शहर संघटिका ज्योती पाटील, तसेच शहर संघटक रोहिदास मुंडेंच्या वतीने आयोजित केला होता.
सदर कार्यक्रमाला उपस्थिती दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, महिला शहर संघटिका ज्योती पाटील, विभाग प्रमुख नागेश पवार, संजय जाधव, शनिदास पाटील, रवी रसाळ, मूर्ती मुंडे, शशिकांत कदम, गजानन शेलार, मंगेश शेलार, सुमित आगले, समाधान कदम, सुहासिनी गुळेकर, राजकुमार गुप्ता, राजेश गोपाळे, सुहासिनी गोळेकर, प्रेरणा नेवळेकर, दत्ता भोसले, प्रमोद कानसे, मूर्ती मुंडे, महेश मुलुम, प्रथमेश कानसे, अतिश साळुंखे, सचिन कदम, सुमीत आमले आधी पदाधिकाऱ्यांचा सत्कार त्यावेळी करण्यात आला.