दिव्यातील ग्लोबल इंग्लिश शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Maharashtra WebNews
0


दिवा, (आरती परब) : दिवा शहरातील ग्लोबल इंग्लिश शाळेत काल २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एल.बी. पाटील (रायगड भूषण), राष्ट्रपती शौर्य पुरस्कार सन्मानित सहाय्यक पोलीस निरिक्षक वसंत खेतले व सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल कोळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली, भविष्य कसे घडवावे? आपल्या प्रत्येक कामात आपण कसे कर्तव्यदक्ष असावे ? याची उत्तम उदाहरणे देऊन मुलांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले.



त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना त्यांच्यातील कलागुण दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्तम नृत्य सादरीकरण केलं. त्यावेळी अनेक देशभक्ती गाणी सादर करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांकडून खुप कौतुक करण्यात आले. प्रसंगी शाळेचे संस्थापक महेंद्र दळवी सर उपस्थित होते. तसेच दिवा शहरातील वंचितचे विकास इंगळे तसेच अनेक मान्यवर व हजारो विद्यार्थी, पालक उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना सोनी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन कार्यक्रमाचा समारोप केला.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)