अवाडा ऑटर्स स्क्वॉश खुली स्पर्धा
मुंबई: वेदांत छेडा या १७ वर्षीय प्रतिभावंत खेळाडूने चौथ्या मानांकित ओंकार विनोदचा ११-३, ११-६, ११-३ असा सरळ गेममध्ये पराभव करून ऑटर्स क्लब, वांद्रे येथे सुरू असलेल्या अवाडा ऑटर्स स्क्वॉश खुल्या स्पर्धेत पदार्पणात १९ वर्षांखालील मुले गटाच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
वेदांतने त्याच्याहून जास्त वयाच्या खेळाडू इतकी परिपक्वता दाखवली. संयम राखला आणि सामन्यावर वर्चस्व राखण्यासाठी अचूक ड्रॉप शॉट्स आणि शक्तिशाली स्ट्रोकचे धोरणात्मक मिश्रण वापरले. अपवादात्मक गेम-प्लेने वेदांतला या गटातून जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून पुढे आणले आहे.
दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत, अव्वल मानांकित करण यादवने सर्वोत्तम खेळात सातत्य राखताना तीर्थ जिल्कावर ११-४, १२-१०, ११-२ अशी सरळ गेममध्ये मात केली. दुसरा गेम वगळता करणला प्रतिस्पर्ध्याकडून फारसा प्रतिकार झाला नाही. दरम्यान, उदित मिश्रानेही अभिनव सिंगचा ११-५, ११-५, ११-५ असा पराभव करताना आगेकूच केली.
निकाल (१७ वर्षाखालील मुली): अनिका दुबे विजयी वि. अनुष्का जोहरी ११-२, ११-३, ११-४; आरिका मिश्रा विजयी वि. सानवी ११-६, ११- ४,११-५; व्योमिका खंडेलवाल विजयी वि. इव्हाना गाडा ११-९, ८-११, ९-११, ११-७,११-५.