Ranji trophy : रणजी सामन्यात भारतीय स्टार गडगडले

 



मुंबई : बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाला १-३ असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघातील स्टार खेळाडू रणजी करंडक स्पर्धेत आपले प्रदर्शन सुधारण्यासाठी सहभागी झाले होते. मात्र रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांसारखे सर्व वरिष्ठ खेळाडू आपल्या आपल्या स्थानिक संघातून खेळताना दिसतील. रणजी सामन्याला आजपासून सुरुवात झाली असून सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाचे सलामीवीर रोहित-यशस्वी-गिल हे दुहेरी आकडा गाठण्यापूर्वीच पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.





मुंबईतील शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसी मैदानावर जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा मुंबईकडून खेळत आहे.  भारतीय संघाचा सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्माला १९ चेंडूंचा सामना करताना केवळ ३ धावा करता आल्या. जम्मू-काश्मीरचा गोलंदाज उमर नाझीरने त्याला आपला शिकार बनवले. भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालही जम्मू-काश्मीरविरुद्धच्या रणजी सामन्यात मुंबईकडून खेळत आहे. यशस्वी जैस्वालने ८ चेंडूत केवळ ४ धावांचा सामना केला. औकीब नबी दारने त्याला एलबीडब्ल्यू करून आपला बळी बनवले.



तर दुसरीकडे पंजाब आणि कर्नाटक यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी सामन्यात पंजाबची कमान शुबमन गिलच्या हाती आहे. प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यानंतर पंजाबने ५० धावापूर्वीच पहिल्या डावात ६ विकेट गमावल्या आहेत. यामध्ये सर्वात खास बाब म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार आणि सलामीवीर शुभमन गिलने ८ चेंडूंचा सामना केला आणि केवळ ४ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर तो बाद झाला. अभिलाष शेट्टी यांनी त्याला आपला बळी बनवले.








Post a Comment

Previous Post Next Post