नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना महापालिकेतर्फे अभिवादन !


कल्याण, ( शंकर जाधव ): नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी गुरुवारी त्यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या समयी उपआयुक्त स्वाती देशपांडे, अतुल पाटील, प्रसाद बोरकर, संजय जाधव, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, घन:श्याम नवांगुळ तसेच महापालिकेच्या इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाने देखील त्यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.




तद्नंतर आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी सुभाष चौक, कल्याण (प.) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. कल्याण पश्चिमेतील, प्रबोधनकार ठाकरे सरोवर (शेनाळे तलाव) येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी पुष्पसुमने अर्पण करुन अभिवादन केले. या वेळी महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे व चीजवस्तू जतन केलेल्या संग्रहालयास भेट देऊन त्याची पाहणी केली.




Post a Comment

Previous Post Next Post