संत सेवालाल गोर बंजारा समितीमार्फत शोभा यात्रेचे आयोजन
दिवा, (आरती परब) : दिव्यातील संत सेवालाल गोर बंजारा समिती (दिवा) तर्फे २८६ वी संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी दिवा शहरातून बंजारा समाजाने संत सेवालाल महाराजांची वाजत गाजत शोभा यात्रा काढली. दिवा पूर्वेतील चौका जवळीच्या मैदानात संत शिरोमणी सेवालाल महाराज, रामराव महाराज व आई जगदंबा माता यांचा भोग विधी कार्यक्रमात होम हवन करण्यात आले तर तेथे जमलेल्या नागरिकांसाठी महाप्रसादाची सोय केली होती. तसेच शालेय विदयार्थ्यांचा गुणगौरव व बंजारा समाजाचा पारंपारिक नृत्याचा कार्यक्रम करण्यात आला. तर बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपारिक वेश केल्याने त्यांनी ही सन्मानीत करण्यात आले होते.या सदर कार्यक्रमास माजी आमदार सुभाष भोईर, इमारत विकासक सीताराम राठोड, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, माजी नगरसेवक दीपक जाधव, विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे, भालचंद्र भगत, उबाठा दिवा शहर अध्यक्ष सचिन पाटील, , व्यापारी संघटनेचे चेतन पाटील, दिवा पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर, बालाजी कदम, संभाजी कदम, अनिल भगत, कुणाल पाटील, अरुण म्हात्रे, इमारत विकासक नामदेव राठोड, वासू राठोड, चंदर राठोड, देवा राठोड, पांडू राठोड, सुनिल राठोड, संत सेवालाल गोर बंजारा समितीचे अध्यक्ष शंकर पवार, सचिव तारासिंग पवार, खजिनदार श्यामसुंदर राठोड, समिती सदस्य विजय पवार, मिथुन आडे, प्रविण राठोड, चंदू चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर सदर समितीचे अध्यक्ष शंकर पवार, सचिव तारासिंग पवार, खजिनदार श्यामसुंदर राठोड यांनी आलेल्या उपस्थित मान्यवरांनाचे स्वागत केले. तसेच संत सेवालाल गोर बंजारा समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

