नाव कापली तर लाडक्या बहिणीला घेऊन मंत्रालयात घुसू

 



महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ 

अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीकडून पत्रकारांचा सन्मान 

 आमदार जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

अंबरनाथ, ( अशोक नाईक  ) : लाडक्या बहीण योजनेतून नाव कापल्यास तुम्ही मतांसाठी महिलांना लाच दिल्याचे सिद्ध होईल. सर्वोच्च न्यायालयात शिक्कामूर्त होईल. मात्र आम्ही नाव कापू देणार नाहीत. जर महायुती सरकारने लाडक्या बहिणींची नाव कापली तर आम्ही या भगिनींना घेऊन मंत्रालयात घुसू त्यांना कॅबिनमध्ये बसू आणि मंत्रांचा जीव मुश्किल करून टाकू असा कडकडीत इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी अंबरनाथमध्ये एका महिला हळदी ककू समारंभात दिला आहे.


अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी सदामामा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, महिला शहराध्यक्ष पुनम शेलार यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ पूर्व मोतीराम पार्क येथील गणपती मंदिराच्या मैदानात रविवारी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान आणि महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. 



या हळदीकुंकू समारंभात महिलांची संवाद साधताना... जर का लाडक्या बहिणींची नाव कापणार असतील तर मत घेऊन त्यांना लाच दिल्यासारखे आहे. सरकार आलं आणि सत्ता आली आता घरी पाठवा. हे चालणार नाही, या सगळ्या महिला भगिनींना घेऊन मंत्रालयात घुसू... केबिनमध्ये महिलांना बसवून, मंत्रांचा जीव मुश्किल करून टाकू, असं तुम्हाला महिलांना नाराज नाही करता येणार. आमच्या महिलांना खोटी आश्वासन देऊन फसवलं आणि आता पळ काढताय, हे होऊ देणार नाही असा विश्वास आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महिलांना यावेळी दिला.


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील आयोजित महिला हळदीकुंकू समारंभ कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, महिला प्रदेश सरचिटणीस विद्या वेखंडे, ठाणे जिल्हा निरीक्षक ऋता आव्हाड, महिला जिल्हाध्यक्ष रूपाली कराळे, अंबरनाथ शहर महिला अध्यक्ष पुरम शेलार, प्रिसिला डिसिल्वा, समाजसेविका आशाताई पाटील, युवती अध्यक्ष गौतमी सूर्यवंशी, अर्चना पितळे, जया गाजरे, कृष्णा पाटील,राजू सूर्यवंशी, विनोद शेलार आदि पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील महिला हळदी कुंकू समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित महिलांना हळदीकुंकू निमित्त भेट वस्तू देण्यात आली.




Post a Comment

Previous Post Next Post