थकबाकी रकमेपोटी निवासी मालमत्ता व बिगर निवासी मालमत्तेवर कारवाई



महापालिकेच्या ६/फ प्रभागातही सिल 

कल्याण, ( आरती परब ) : डोंबिवली (पूर्व) ६/फ प्रभागातही काल   महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांच्य निर्देशानुसार आणि कर निर्धारण व संकलन विभागाच्या स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकी रक्कमेपोटी निवासी मालमत्ता व बिगर निवासी मालमत्ता सिल करण्याची धडक कारवाई   करण्यात आली.

६/फ प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर, अधिक्षक महेश पाटील, वरिष्ठ लिपिक दौलत जांभेकर, लिपिक शशिकांत म्हात्रे यांचे पथकामार्फत डोंबिवली (पूर्व) खंबालपाडा कल्याण रोड येथील कोळीवाडा हॉटेल  हे रक्कम रु.१,७३,२७३/- थकबाकीपोटी सिल करण्यात आले.


तसेच डोंबिवली (पूर्व) रेल्वे कॉलनी, कल्याण रोड  सद्गुरू बिल्डिंग मधील विकासक जगदीश वाघ यांच्या मालकीचे असलेल्या दोन सदनिका क्रमांक ४०१, ७०१ या रक्कम रु. २०,९६,४३३/- इतक्या थकबाकी पोटी सिल करण्यात आल्या.




Post a Comment

Previous Post Next Post