मुबंई मंत्रालय ते डोंबिवली 'एक दौड वीर जवानांसाठी'

Maharashtra WebNews
0

 



३५० धावपटुंचा सहभाग 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :   रनर्स क्लॅन फाऊंडेशन, डोंबिवली आयोजित 'एक दौड वीर जवानों के लिए 'ही अर्बन अल्ट्रा दौड मध्ये  सुमारे ३५० धावपटुंचा सहभाग घेतला.ही दौड तीन प्रकारात खेळविली गेली. ६५ किमी अर्बन अल्ट्रा दौड, ३५ किमी काॅन्फीडन्स दौड व १५ किमी इन्स्पायरींग दौड या तीन अंतरासाठी ही दौड आयोजित केली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त एस.काशिद, कुलाबा आणी डि.बी.जाधव ग्रुपचे संस्थापक मच्छिंद्र जाधव, कल्याण तसेच लेफ्टनन्ट कमांडर नौसेना (निवृत्त) बिजय नायर यांनी दौडला हिरवा कंदिल दाखला. त्यानंतर दौड मंत्रालय, नरीमन पाॅईंट, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चेंबूर नाका, वाशी ब्रिज, पाईपलाईन रोड, शिळफाटा, कॅ.शहीद विजय सच्चान स्मारक, डोंबिवली पश्चिम आणी शेवटी नेहरू मैदान डोंबिवली पूर्व येथे सकाळी दौडची सांगता झाली.




    सांगता सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून  आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सर्व धावपटुंच्या आणि गट कप्तानांना सन्मानचिन्ह देण्यात आले.  यावेळी मरणोपरांत सेना मेडल मिळविलेल्या शहीद जवान जोतिबा गणपती चौगुले यांच्या वडीलांचा सत्कार सन्मानचिन्ह आणि आर्थिक मदत म्हणून धनादेश देऊन करण्यात आला. आपले हे समाजकार्य असेच पुढे निरंतर चालत राहो अशा शुभेच्छा आमदार रविंद्र चव्हाण यांनी आयोजकांना दिल्या. त्यानंतर आपल्या आभारपर भाषणात फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण गुंडप यांनी सर्व प्रायोजकांचे, प्रमुख पाहुण्यांचे आणि  दौडसाठी मेहनत घेतलेले विश्वस्त मुकुंद कुलथे ,दौडचे प्रकल्प प्रमुख विश्वस्त गिरीश लोखंडे आणि ईतर सर्व सदस्यांचे  आभार मानले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी झुंबा डान्सच्या रंजना गुप्ता आणि विश्वस्त नितीन कुवर यांनी सांभाळली.





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)