पुण्यात रिलायन्स मेडलबच्या अत्याधुनिक डायग्नोस्टिक लॅबचा शुभारंभ


पुणे : पुणे शहरातील आरोग्य सेवेत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत रिलायन्स मेडलब या संस्थेने आपल्या अत्याधुनिक डायग्नोस्टिक लॅबची सुरुवात केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि रुग्णकेंद्री दृष्टिकोन ठेवत ही सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

या नव्या लॅबमुळे पुणेकरांना आता अचूक आणि विश्वासार्ह तपासणी सेवा त्यांच्या अगदी जवळच मिळणार आहेत. अत्याधुनिक उपकरणे, प्रशिक्षित तज्ज्ञांची टीम आणि जलद व अचूक रिपोर्ट्स ही या लॅबची वैशिष्ट्ये असणार आहेत.



“आपल्या आरोग्यासाठी आमची वचनबद्धता” या ब्रीदवाक्याखाली रिलायन्स मेडलब रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यास कटिबद्ध असून, आधुनिक आरोग्य सुविधा अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.


पुण्यातील वाढत्या आरोग्य गरजांच्या पार्श्वभूमीवर ही नवी सुविधा महत्त्वाची ठरणार असून, नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह डायग्नोस्टिक सेवा उपलब्ध करून देण्यात मदत होणार आहे.

दरम्यान, रिलायन्स मेडलबचे वरिष्ठ अधिकारी (नॅशनल सेल्स मॅनेजर) प्रदीप दिघे यांच्या कार्यक्षमतेने आणि प्रयत्नांमुळे तसेच संपूर्ण टीमच्या सहभागातून हा प्रकल्प साकार झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.




Post a Comment

Previous Post Next Post