नागरिकांनी मानले शिवसेनेचे आभार
डोंबिवली ( शंकर जाधव ) : अनेक. दिवसांनपासून लोढा हेवन निळजे येथील सोसायटी मधील पाण्याचा गंभीर प्रश्न बनला होता. सोसायटी सदस्यांनी शिवसेना उपतालुकाप्रमुख गजानन पाटील यांच्याकडे समस्या मांडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा मतदार संघांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्याला यश आले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या पाईपलाईनचे उदघाटन करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी पुढाकार करून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शिवसेना आमदार राजेश मोरे उपस्थित होते.
याप्रसंगी युवा सेना कल्याण जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील, विकास पाटील, उपतालुका प्रमुख विकास पाटील, माजी नगरसेविका पूजा पाटील, विधानसभा संघटक बंडु पाटील, तालुकाप्रमुख अर्जुन पाटील, कल्याण जिल्हा-युवासेना सचिव राहुल म्हात्रे यासह अनेक नागरिक उपस्थित होते.पाणी समस्या लवकर दूर होणार असल्याने स्थानिक आनंदी होते.