सर्व शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
दिवा, (आरती परब) : दातीवली येथील विदयादर्पण एज्युकेशन् सोसायटीचे सिम्बॉयसिस कॉन्वेंट हायस्कूल शाळेचे 'वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून साक्षी रमाकांत मढवी (रमाकांत मढवी फाउंडेशन अध्यक्षा) व समीर बाळाराम पाटील (उपाध्यक्ष श्रीसाई सेवक मंडळ, दिवा) शाळेच्या चेअरमन उषाराणी देव, शाळेचे संस्थापक कमलराज देव, शाळेच्या प्राचार्या स्नेहलता देव उपस्थित होते. प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते दिपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
शाळेच्या प्राचार्या स्नेहलता देव आणि शाळेच्या कार्यालय अधीक्षक प्राजक्ता मेहेर यांच्या नेतृत्वाखाली तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मधूश्रुंता परिदा यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेतील सर्व शिक्षकांनी सदर स्नेहसंमेलनात प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग कसा राहील यासाठी अथक प्रयत्न केला. या स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन शाळेच्या पर्यवेक्षिका श्रावणी साजेकर आणि वरिष्ठ शिक्षिका विनोदा गोविंदन यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या केले. या स्नेहसंमेलना मध्ये जवळजवळ ४५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असे समाज प्रबोधनात्मक 'किर्तन', ‘नाटक’, गीत सादरीकरण, भाषण तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती दर्शविणारे शिवराज्याभिषेक सोहळा तसेच अनेक कला, संस्कृतीचे अद्भूत प्रदर्शन केले. ज्याला उपस्थित पालकांनी भरभरून दाद दिली.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इ. १० वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच सर्व शिक्षक वृदांना देखील पुरस्कृत करण्यात आले. खरंच हे वार्षिक स्नेहसंमेलन केवल नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले हे संमेलन अंतर्गत करणारे होते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून केले. सदर वार्षिक स्नेहसंमेलनाचे आभार प्रदर्शन शाळेचे डेप्युटी विनोद गुरव यांनी केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
.jpeg)
