जिल्ह्यात २५ हजार ७७३ अर्ज दाख
ठाणे : 'आरटीई' अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवे प्रकिया पार पडली असून या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी १० फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३२६ रिक्त जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी अंतिम २५ हजार ७७३ अर्ज दाखल झालेआहेत.
आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सोडत (लॉटरी) कार्यक्रम सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना विविध वाहिन्यांवर लाईव्ह पाहता यावा यामुळे दि. १० फेब्रुवारी, २०२५ रोजी दुपारी ०१.०० वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्या अंतर्गत वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जाते.
पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणी बाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी दिली.