पालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात ४०० पेक्षा अधिक कुटुंबे बाधित
शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांचे प्रतिपादन
ठाणे, / आरती परब : ठाणे महानगरपालिकेने घोषित केलेल्या कळवा- खारेगाव विभागातील प्रारूप विकास आराखड्यामध्ये कळवा शास्त्रीनगर, सह्याद्री, सुदामा, दत्तवाडी आणि खारेगाव परिसरातील सुमारे ४०० पेक्षा अधिक कुटुंबे बाधित होणार आहेत. या संभाव्य बाधित रहिवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी नागरिकांशी संवाद साधला.
बैठकीत रहिवाशांनी त्यांच्या समस्या, अडचणी आणि चिंतेचे मुद्दे मांडले. त्यावर प्रतिक्रिया देताना दिपेश म्हात्रे यांनी आश्वासन दिले की, या विषयावर लवकरच ठाणे महानगरपालिका आयुक्त तसेच मुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रहिवाशांच्या हक्कांचा आवाज बुलंद करण्यात येईल. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जोपर्यंत रहिवाशांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील. रहिवाशांच्या हक्कांसाठी ही लढाई अखेरपर्यंत सुरूच राहील.
या बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये उपजिल्हा प्रमुख विजय देसाई, शहर प्रमुख लहू चाळके, दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, शहर संघटक रवींद्र सुर्वे, महिला शहर संघटिका कल्पना कवळे, उपशहर प्रमुख जितेंद्र गवते, विभाग प्रमुख दुर्योधन फडतरे, नंदू पाटील, संतोष कवळे, संतोष सुर्वे, विभाग महिला संघटिक अनिता गवते, अमिता चव्हाण, रुक्साना सावंत, युवा शहर समन्वयक साहिल पाटील, युवा विभाग अधिकारी आनिकेत कांबळे, दत्तात्रय राऊत, अमोल गोतारणे, उपविभाग प्रमुख रवींद्र साटम, गुरुदत्त देसाई, सुधीर चव्हाण, दौलत सरवणकर, नरेंद्र पवार, राजेंद्र दाते, युवा उपविभाग अधिकारी ऋग्वेद सावंत, शाखाप्रमुख प्रदीप जाधव, गणेश जाधव, संजय मापदि, समीर कदम, विवेक मात्रे, पांडुरंग लोगडे, सुदेश दरेकर, किशोर मिस्त्री, जगदीश चौधरी, राज रमेश पाटील, नरेंद्र विचारे, ज्ञानेश्वर पऱ्हाड, समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना, युतीसेना तसेच कळवा डीपी प्लॅनमधील संभाव्य बाधित रहिवासी व गाळे धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.