शीळ- मुंब्रा- कळव्याच्या ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
दिवा, \ आरती परब : यावर्षी देखील टोरंट पॉवरकडून एकता आणि सामुदायिक संबंध वाढवण्याच्या उद्देशाने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रमजान महिना सुरू आहे. शिळ- मुंब्रा- कळवा नागरिकांसाठी टोरंट पॉवरतर्फे डायमंड बैंक्वेट हॉल कौसा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास शहरातील मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली. यावेळी सर्व पोलीस ठाण्याचे एसपीआय, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, प्रसिद्ध राजकीय लोक, विविध मीडिया/ पत्रकार मंडळी, आणि क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक देखील उपस्थित होते. यावेळी, जीवन क्लर्क उपाध्यक्ष, जय पंड्या महाव्यवस्थापक, चेतन बदियानी वरिष्ठ पीआरओ, टोरंट पॉवर, फायर ब्रिगेडियर विनय बहल सुरक्षा प्रमुख यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह टोरंटच्या टीमने सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.
मौलाना तंजीम यांनी उपस्थित पाहुण्यांना रमजान आणि इफ्तारचे महत्त्व समजावून सांगितले. पाहुण्यांनी टोरंट पॉवरच्या व्यवस्थेचे कौतुक केले आणि सांगितले की अशा कार्यक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये सहकार्य, शांतता आणि एकोपा निर्माण होण्यास मदत होते.