डोंबिवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी

 



सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनची मागणी 

डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळ रस्त्याच्या कडेला अनधिकृत फेरीवाले बसतात. आजवर या फेरीवाल्यांवर पालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विभागाकडून ठोस कारवाई झालेली दिसली नाही. के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाजवळ तर फेरीवाल्यांनी आपले बाकडे, गाड्या लावून आपलाच रस्ता असल्यासारखे बसलेले दिसतात.वास्तविक पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.मात्र तसे होत नसल्याने सेफ्टी वेल्फेअर असोसिएशने आवाज उठवला आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक हा 'ना फेरीवाले क्षेत्र' घोषित करावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

  

  याबाबत अधिक माहिती देताना सेफ्टी वेल्फेअर असोसिएशचे संस्थापक अध्यक्ष विशाल शेटे म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजाचे अश्वारूढ स्मारकाचे लोकार्पण १७ मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या परिसरात फेरीवाले अनधिकृतपणे आपले बस्थान मांडून बसले आहेत.पण आता या चौकात छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक तयार करण्यात आले असून याचे पावित्र्य आपण सर्वानी जपणे अपेक्षित आहे. यासाठी या चौकातील सर्व परिसर ना फेरीवाले क्षेत्र घोषित करून येथे फलक लावण्यात यावे व येथे कोणीही अतिक्रमण करु नये विनंती अर्जाद्वारे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांच्याकडे मागणी केली आहे. हा क्षेत्र महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडळ यांच्या अख्यारीत येत येथील कार्यकारी अभियंता यांना सुद्धा 'ना फेरीवाला क्षेत्र' घोषित करण्याचे विनंती अर्ज देण्यात आला आहे. याची अंमलबाजवणी लवकरात लवकर व्हावी आणि येथे पुन्हा फेरीवाले व खाद्य पदार्थ विक्रेते बसणार नाही याकडे लक्ष द्यावे केली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post