कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्ष हेमलता नरेंद्र पवार यांचा पुढाकार
कल्याण \ शंकर जाधव : "हाथी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है.. पर जंजीर में जकड़ा राजा मेरा, अब भी सब पे भारी हैं"... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि बलिदानावर आधारित छावा चित्रपटातील एक भारदस्त आणि संभाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा भारदस्त संवाद. प्रदर्शित होऊन एक महिना उलटल्यानंतरही छावा चित्रपट हाऊसफुल्ल चालत असून शिवप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळत असून कल्याण विकास फाउंडेशनतर्फे कल्याण पश्चिमेतील नागरिकांसाठी आयोजित या चित्रपटाच्या मोफत स्क्रीनिंगला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्ष हेमलता नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी गाजवलेला अतुलनीय पराक्रम तसेच दिलेले बलिदान म्हणजेच हा छावा चित्रपट. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरातून छावा चित्रपट पाहण्यासाठी शिवप्रेमी, इतिहास प्रेमींची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्ष हेमलता नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ३२ सिद्धेश्वर आळी येथील नागरिकांसाठी, भाजप कार्यकर्त्यांसाठी हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे हे बलिदान आणि झालेला अतोनात छळ पाहून सर्वांचे डोळे भरून आल्याचे दिसले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी गाजवलेला पराक्रम आणि त्यानंतर आपल्या धर्म रक्षणासाठी दिलेले हे बलिदान अजिबात विसरता कामा नये. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे आज आपण हे सोनेरी दिवस पाहत आहोत. त्यामुळे हा छावा चित्रपट प्रत्येक व्यक्तीने पाहिला पाहिजे आणि विशेष म्हणजे आपली नवी पिढी, लहान मुले यांनाही तो दाखवला पाहिजे असे मत यावेळी कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्ष हेमलता पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी कल्याण विकास फाऊंडेशन अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार, भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस अमित धाक्रस, हिमांशु नरेंद्र पवार, एस.एम जोशी, राजेंद्र फडके, महेश केळकर, महेश चौधरी, समृद्धी देशपांडे, स्नेहल सोपारकर, जयश्री देशपांडे, काका गवळी, संदिप बेंद्रे, स्वाती पाचघरे, श्री देवस्थळी, गणेश पोखरकर, विकास साळवी, विलास तेली,दिपा शाह तसेच कल्याण विकास फाउंडेशचे पदाधिकारी यांच्यासह वार्ड क्रमांक३२ सिद्धेश्वर आळी येथील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.