अंबरनाथमध्ये बजरंग दलाचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा
अंबरनाथ / अशोक नाईक : अंबरनाथमध्ये विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल अंबरनाथ जिल्हा मंडळाच्यावतीने सोमवारी १७ मार्च रोजी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत, 'औरंगजेबाची कबर हटवा...अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू' असा थेट इशारा देत, जोरदार घोषणाबाजी करत, सरकारला 'अल्टिमेट'देण्यात आला आहे.
सरकारने काही दिवसात कबर हटवावी, अन्यथा बजरंग दलाचे कार्यकर्ते 'चलो संभाजीनगर' नारा देतील आणि औरंगजेबाची कबर उध्वस्त करतील, असा इशारा सरकारला निवेदन पत्राद्वारे देण्यात आला आहे. या मोर्चामध्ये अंबरनाथ, उल्हासनगर,श्रीमलंगड विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
'सरकारला आम्ही सांगू इच्छितो, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आता स्थानिक पातळीवर निवेदनाद्वारे आपल्या भावना कळवत आहेत. जर रस्त्यावर उतरून तिकडे कुच करेल... तर जाण्या-येण्याचे सर्व रस्ते बंद करावे लागतील, कुठून कार्यकर्ते जातील आणि काय करून येतील हे सरकारला सांगण्याची गरज नाही. त्यांनी लक्षात घ्यावे आणि येणाऱ्या काळामध्ये जो वेळ दिलेला आहे. त्या अवधीत कारवाई केली नाही, तर विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाकडून 'चलो संभाजीनगर' नारा देत, पुन्हा एकदा कारसेवा करेल... आणि ती कारसेवा संभाजीनगर मधील कबरे वर करेल... हा इतिहास सर्व सामान्यांना माहित आहे. पुन्हा एकदा कारसेवा होईल आणि त्या कबरेचा समूळ नाश करण्यात येईल.
सध्या तरी आम्ही सरकारला निवेदन देऊन अल्टिमेटम दिलेले आहे. त्यावर लवकरात लवकर कारवाई करून संभाजीनगर येथील 'कबर' हटवून त्या जागेचे पवित्र राखण्यात यावे, सरकारने आमची मागणी पूर्ण केली नाही, तर येणाऱ्या काळामध्ये 'चलो संभाजीनगर' नारा देत,पुन्हा एकदा कारसेवा करेल, असा हुंकार इशारा विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने दिला आहे.