दिवा \ आरती परब : शुक्रवारी सकाळी शाळेत जाणाऱ्या मानपाडा हद्दीत एका सात वर्षाच्या मुलाचे खंडणी करिता अपहरण करण्यात आले होते. अपहरण कर्त्या मुलाच्या आई वडिलांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली व ह्या प्रकरणात पोलिसांनी गुप्तपणे तपास यंत्रणा कामाला लाऊन अगदी तीन ते साडेतीन तासात अपहरण केलेल्या मुलाची सुटका करुन आरोपीच्या मुस्क्या आवळल्या. या त्वरित राबविलेल्या पोलीस यंत्रणेमुळे भयंकर प्रकार टळला.
मानपाडा पोलिसांच्या तत्परतेचे आणि शौर्याची दखल शिवसेनेने घेऊन शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वात उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, विवेक खामकर, दिनेश शिवलकर, सुदाम जाधव ह्यांनी मानपाडा पोलीस स्टेशन गाठून वरिष्ठ पोलीस निरिक्षक कादमाने व त्यांच्या इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले. त्याच बरोबर आपले डॅशिंग पोलीस डी.सी.पी. अतुल झेंडे यांचे ही आभार मानले.