शहरात पसरले धुराचे लोट; कचऱ्यावर मातीचा थर
अंबरनाथ/अशोक नाईक : अंबरनाथ आणि बदलापुरात गेल्या दोन दिवसांपासून ४३ अंश सेल्सिअस पारा पोहोचलेल्या मुरबाड खालोखालो तापमानात वाढ होत असताना, यावर्षी मार्च महिन्यातच उष्णतेचा पारा चढू लागला आहे. रानावनात 'वणवा' पेटू लागला आहे. तर बुधवारी दुपारी अंबरनाथ नगरपालिकेच्या चिखलोली येथील डम्पिंग ग्राऊंडवर भीषण आग लागून परिसरात धुराचे लोट पसरून होळी सणाच्या पार्श्वभूमीवर डम्पिंग ग्रााऊंडव 'धूरहोळी' ची सुरुवात झाल्याची बोंबाबोंब चर्चा शहरात होऊ लागली आहे.
नव्याने सुरू होणाऱ्या अंबरनाथ तालुका दिवाणी न्यायालयासमोरील अनेक दशकांचे बेकायदेशीर मोरिवली पाडा येथील डम्पिंग ग्राऊंड स्थलांतरित करून पुन्हा चिखलोली येथील सर्वे नंबर ३२ मधील शासनाने दिलेल्या ३३ एकर जागेवर शहरातील कचरा डम्प केला जात आहे. या परिसरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात गृहसंकुल पार्क उभारल्याने येथील रहिवाशांनीसुद्धा येथील दुर्गंधी आणि प्रदूषणाविरोधात 'डम्पिंग हटाव' मागणी लावून धरली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेकडे कोणत्याच प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा नसल्याने कचऱ्याचे ढिगार्यावर ढिगारे वाढू लागले आहेत. त्यामुळे येथील दुर्गंधीमय प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. त्यात आता डम्पिंग ग्रााऊं अधून-मधून पेट घेऊन निर्माण होणाऱ्या धूर प्रदूषणामुळे नागरिक अनेक श्वसन रोगाचे शिकार होऊ लागल्याची चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
कचऱ्यावर मातीचा थर भरावा टाकणार!
बुधवारी दुपारच्या सुमारास डम्पिंग ग्राउंडच्या बाजूच्या सोसायटीत सुकलेल्या गवताला आग लागून तीस आग पसरत पसरत डंम्पिंग ग्राऊंडपर्यंत आली. आणि कचऱ्याने पेट घेतला आहे. अग्निशमन दलाला पाणीपुरवठा केला असून आज विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहोत. आग विझवल्यानंतर त्या कचरावर मातीचा थर टाकण्याचा प्रस्ताव असल्याचे आरोग्य विभागाचे सुहास सावंत यांनी सांगितले.