डोंबिवली ( शंकर जाधव ) : जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे येथे सर्व पोलीस महीला अंमलदार व महीला होमगार्ड,खाकीतील सखी सदस्य, महिला सुरक्षा समिती सदस्य, प्रवासी संघटना पदाधिकारी यांना जागतीक महीला दिनाच्या शुभेच्छा देवुन गुलाब फुल वाटप करण्यात आले. तसेच पोलीस ठाणेत महिला सुरक्षा दक्षता समिती सदस्यांना बोलावून त्यांची बैठक घेऊन त्यांना गुलाब फुल देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस अंमलदार, होमगार्ड व रेल्वे सुरक्षा समिती सदस्यांना यांना गुलाब पुष्प देऊन महीला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. 'खाकितील सखी' बाबत महिला सुरक्षा जनजागृती करण्यात आली.तसेच प्लँटफॉर्म वरील व ट्रेनमधील महिला प्रवाशी यांना गुलाब पुष्प देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या.
आम्ही सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार महिला सुरक्षिततेसाठी बांधील असून,महिलांनी रेल्वे प्रवासात खाकितील सखी व कोटो ॲपमध्ये सहभाग घ्यावा. महिलांनी रात्री प्रवास करते वेळी शक्यतो महिलांच्या डब्यातूनच प्रवास करावा, त्यामध्ये पोलीस अंमलदार यांची नेमणूक असते. रात्रीच्या वेळेस स्टेशन थांबण्याची वेळ आल्यास शक्यतो स्टेशनवरील किंवा स्टॉलधारकांनी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात सहज दिसता येइल असे थांबावे.
प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान चीज वस्तू सांभाळून प्रवास करावा. प्रवासादरम्यान येणाऱ्या अडी-अडचणीबाबत रेल्वे पोलीस हेल्प लाईन १५१२ या क्रमांकाचा वापर करावा. सदर वेळी आमचे उपस्थित २१ महिला पोलीस अंमलदार ८ महिला होमगार्ड व ६ महिला सुरक्षा समिती सदस्य उपस्थित होते अशी माहिती डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणे वपोनि किरण उंदरे यांनी दिली.