डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र पोलीस विभागातून विष्णुनगर पोलोस ठाणे यांच्या पुढाकाराने अखिल कोकण विकास महासंघ ( कोकण वासियांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना )च्या वतीने आधार इंडियाच्या सहकार्याने जागतिक महिला दिनी महिला पोलीस अधिकारी वर्ग तथा सामाजिक क्षेत्रात राज्यस्तरीय महिला सक्षमीकरण कौशल्य विकास योजना लाखो कुटुंबात पोहचवणाऱ्या अर्चना खिल्लारे, मोहिनी दुखंडे, अनिता घुमरे, मनिषा सुर्वे यांना उल्लेखीय कामगिरी केल्याबद्द्ल सत्कार करून गौरविण्यात येईल.
डोंबिवली पश्चिमेकडील रेतीभवन भवन -आधार इंडिया येथे डॉ.अमित दुखंडे मिनी हॉल पार पडलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वपोनि संजय पवार म्हणून उपस्थित होते.संस्थापक अध्यक्ष तानाजी परब, सचिव डॉ. अमित दुखंडे, डोंबिवली अध्यक्ष दिशा काटकर, माणगाव तालुका अध्यक्ष रसिका शिंदे, उपाध्यक्ष एडवोकेट योगिता सावंत, संघटनेच्या सल्लागार सरोज नेरूळकर, सुहास पांगे, प्रवीण घोलम आदींच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला.
अखिल कोकण विकास महासंघ मार्फत आधार राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र द्वारा आपल घर सांभाळून काम करत असलेल्या महिलांना कला, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, गायन, गीत, चित्रकला, खेळ आदीमध्ये सहभागी होऊन महिला सक्षमीकरणा साठी वर्षभर उपक्रम राबवित आहे. देशाची राष्ट्रपतीही महिला असून अनेक मोठ्या पदावर महिला आहे. अटके पार झेंडा रोवत महिलांनी देशाचे व महाराष्ट्राचे नाव अधिकाधिक उंचविले आहे. खरं पाहता ३६५ दिवस महिलाचेच आहे असे यावेळी संस्थापक अध्यक्ष तानाजी परब यांनी यावेळी सांगितले. तर सचिव डॉ.अमित दुखंडे म्हणाले, आज महासंघाच्या वतीने महिलांचा सन्मान आणि सक्षमीकरण योजना आणि त्यांच्या सबलीकरणाचा भाग असल्याचा आनंद होत आहे. प्रमुख पाहुणे वपोनि संजय पवार म्हणाले, महिला पोलीस आपले नागरिकांचे रक्षण करत असतात. या महिला पोलिसांना माझा सलाम आहे.