युवासेनेचे यश जाधव यांच्या पुढाकाराने 'इफ्तार पार्टी'चे आयोजन

  



 अंबरनाथ \ अशोक नाईक : अंबरनाथ शहरातील पश्चिमेला शनिवारी रमजान महिन्यानिमित्त सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढावा यासाठी वाय. जे. बाॅस सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमासाठी युवासेनेचे यश जाधव यांनी विशेष पुढाकार घेतला.या प्रसंगी विविध समाजघटकांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

  

उपस्थित मान्यवरांनी सर्वधर्मीय एकता आणि सद्भावनेचा संदेश दिला. यश जाधव यांनी या उपक्रमाद्वारे समाजातील ऐक्य आणि शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला असून दिवंगत अजय जाधव यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत नागरिकासाठी असे उपक्रम सुरू ठेवू असा विश्वास यावेळी यश जाधव यांनी व्यक्त केला.


यावेळी माजी नगरसेवक नासिर कुंजाली,तसेच देवदत्त सरवदे यांच्यासह कार्यक्रमात धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. वाय.जे.बाॅस सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेख यांच्याकडून समाजासाठी केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.





Post a Comment

Previous Post Next Post