जागतिक महिला दिनानिमित्त पि.डी कारखानीस महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन

 



अंबरनाथ/अशोक नाईक : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आजीवन शिक्षण व विस्तार विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पि.डी कारखानिस महाविद्यालयात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. 

   या कार्यक्रमाचे आयोजन-नियोजन तसेच सूत्रसंचालन वाणिज्य विभाग प्रमुख व आजीवन शिक्षण विस्तार विभाग समन्वयक डॉ. शुभांगी केदारे  यांनी केले होते. प्रास्ताविक मांडताना त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यात त्या म्हणाल्या. समाजात स्त्री, पुरुष समानता म्हणण्यापेक्षा व्यवहारात आणल्याशिवाय खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन होऊ शकत नाही. त्यामुळे समाजामध्ये समानतेचा व्यवहार समाजातील प्रत्येक घटकांचा म्हणजेच स्त्रियांशी सुद्धा होणे अत्यंत गरजेचे आहे. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


या कार्यक्रमात अर्थशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. वंदना कटारे यांनी ‘स्त्री-पुरुष समानता: आदर्श समाज रचनेचा पाया’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आपले मत प्रतिपादन करताना त्या म्हणाल्या समाजामध्ये सद व्यवहार असेल तर समाजामध्ये असलेली गुन्हेगारी तसेच न्यायालय, तुरुंग, वेगवेगळ्या व्यवस्था याची गरज न भासणे म्हणजेच आदर्श समाज निर्माण होईल. समाजामध्ये महिलांबद्दल आदर सन्मानाची भावना वाढली पाहिजे व असुरक्षिततेची भावना कमी झाली पाहिजे यावर सामूहिकरित्या प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले.


त्यानंतर, भास्कर थोरात यांनी तर आपले मत प्रतिपादन करताना त्यांनी असे सांगितले की एक आई ही शंभर शिक्षकांच्या पेक्षाही सर्वोत्तम आहे. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख व इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर आनंद दांडगे यांनी भारतामध्ये संविधान नसते तर भारतातील स्त्रियांना कोणताच आधार नव्हता. म्हणून महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व भारतीय संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या असंख्य प्रयत्नाने भारतातील महिलांना संपूर्ण मूलभूत हक्क लिखित स्वरूपात संविधानाद्वारे प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे भारतातील सर्व समाजातील महिलांनी हे उपकार विसरून नये.त्यांनी आपल्या महिला जातीला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.  मराठी विद्यार्थी जीवक  गांगुर्डे यांनी स्त्री जीवनावर स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.  


तसेच, एफ.वाय.बी.कॉमच्या विद्यार्थिनी पूजा राव यांनी लग्न झाल्यानंतर सुद्धा शिक्षण सुरू ठेवावे आणि स्वतःच्या प्रगतीला पूर्णविराम देऊ नये, या आपल्या विचारांनी चर्चासत्रात महत्त्वाची भर घातली.  कार्यक्रमाचा समारोप डॉ. शुभांगी केदारे  यांच्याद्वारे आभार प्रदर्शनाने झाला.महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य संदीपान नवगिरे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल दोन्ही  विभागांचे कौतुक केले.




Post a Comment

Previous Post Next Post