त्या ६५ इमारतीतील राहिवाशांना न्याय द्यावा


आंबेडकरवादी जनहित संघटनेचे आमरण उपोषणाच्या माध्यमातून मागणी 

डोंबिवली / शंकर जाधव :  आंबेडकरवादी जनहित संघटनेने आमरण उपोषणाच्या माध्यमातून त्या ६५ इमारतीतील राहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली आहे. बुधवारपासून डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात उपोषणास सुरुवात झाली. सायंकाळपर्यत या उपोषणाची प्रशाननाने दखल न घेतल्याने उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

    उपोषणकर्ते संदीप गजघाट म्हणाले, त्या ६५ बिल्डिंगच्या रहिवाशांना पर्यायी घरे अथवा मोबदला देण्यात यावा, या प्रकारात बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यापासून ते महानगरपालिका, राज्य सरकार, आवास योजनेतील दोषी अधिकारी, दोषी बिल्डर, दोषी राजकीय व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी. तसेच शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, स्टाफ, इतर कर्मचारी यांची भरती करण्यात यावी व रुग्णालयातील लागणाऱ्या वैद्यकीय उपकरणांची पूर्तता करण्यात यावी. 



शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत पावलेल्या सुवर्णा सरोदे प्रकरणातील दोषींवर कारवाई करून कुटुंबाला न्याय आणि योग्य ती आर्थिक मदत मिळावी अशा मागण्यांसाठी जनहित संघटना माध्यमातून दामोदर काकडे, संदित गजघाट,अनंत पारदुले, दिपक गमरे, दिपक भालेराव, दिपक साळवे, दिनेश साळवे, हरिशचंद्र कांबळे, सुमित रनकुटे, लक्ष्मणराव आंभोरे, प्रशांत टेकुळे, विजय रणदिवे, सुरेद्र गौतम, विश्वविकास गायकवाड,गौतम वाकचौरे, प्रमिला सावंत आदी उपोषणास बसले असल्याचे सांगण्यात आले.





Post a Comment

Previous Post Next Post