दिवा/आरती परब : जागतिक महिला दिना निम्मीत्त ठाकरे गटाच्या पुरस्कृत शिव आरोग्य सेना (ठाणे जिल्हा) यांच्या विद्यमाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या सुचनेने, शिवसेना खासदार राजन विचारे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आदरणीय केदार दिघे शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर आणि शिव आरोग्य सेनेचे सरचिटणीस जितेंद्र (दादा) सकपाळ यांच्या मार्गदर्शनाने ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे व दिवा शहरप्रमुख सचिन राम पाटील, शिव आरोग्य सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक प्रशांत भुईंबर, ठाणे जिल्हा समन्वयक एकनाथ अहिरे यांच्या सहकार्याने व अजित शंकर माने यांच्या आयोजनाने जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य सेवा देणाऱ्या दिवा शहरातील हरदेव हाॅस्पीटल मधील महिला डॉक्टर, नर्स ,आया व महिला कर्मचारी यांचा गुलाबाचे फुल व वेफर्स, बिस्किटे देऊन सन्मान करण्यात आला.
दिवसाचे चोवीस तास, वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस दिवेकरांन साठी झटणाऱ्या या सर्व माऊलींचा ठाकरे गटा तर्फे सत्कार केला गेला. या प्रसंगी दिवा शहरातील आरोग्य सेनेचे पदाधिकारी दिवा शहर समन्वय अजित शंकर माने, नितीन सावंत, विलास उतेकर, राजेन्द्र शिरसेकर, अरविंद दिक्षित, शंकर राणे उपस्थित होते.