जागतिक महिला दिनानिमित्त ज्योती पाटील यांनी केले महिलांचे सन्मान

Maharashtra WebNews
0

 


ज्योती पाटील यांना वाढदिवसानिमित्त महिलांनी दिल्या शुभेच्छा 


दिवा / आरती परब : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व तन्वी फाउंडेशन दिवा यांच्या संयुक्त विद्यमाने बी. आर. नगर येथे महिला दिनाचे औचित्य साधून सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान दिव्यातील महिलांचा या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. तर त्याच दिवशी ज्योती पाटील यांच्या वाढदिवसासाठी महिलांनी ही शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले. 


यावेळी दिवा शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांचा, बचत गटातील महिलांचा आयोजक ज्योती पाटील यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या अनोख्या कार्यक्रमाला दिवा शहरातील शेकडो महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सर्वसामान्य महिलांचे कौतुक करण्यासाठी ज्योती पाटील यांनी आयोजित केलेला सन्मान सोहळ्यासाठी आलेल्या मान्यवरांनी पाटील यांचे विशेष कौतुक केले. तर हा सोहळा नंतर चांगलाच रंगला. ज्योती ताईंच्या वाढदिवसानिमित्त दिव्यातील सामान्य महिलांनी, लहान मुलांनी स्टेजवर डांन्स करत सगळ्यांच्या टाळ्या मिळवल्या. ज्योती पाटील यांचा वाढदिवस आणि महिला सन्मानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. 


या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, जिल्हा संघटिका वैशाली दरेकर, जिल्हा युवा अधिकारी प्रतीक पाटील, दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, उपशहर संघटक प्रविण उतेकर, विधानसभा संघटिका योगिता नाईक, विभाग प्रमुख, महिला पदाधिकारी, शाखाप्रमुख, युवा सेना, गटप्रमुख  यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)