जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मिनल करनवाल

Maharashtra WebNews
0


जळगाव :  नांदेड जिल्हा परिषदेत गेल्या अडीच वर्षापासून कार्यरत असणाऱ्या मिनल करनवाल यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेडमध्ये उत्तम उपक्रम, योजना राबवून नांदेडला राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यात मिनल करनवाल यांचा मोठा वाटा आहे. जळगावमध्ये देखील ते असेच काम करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. 


मिनल करनवाल यांनी सोमवारी अखेरचा नांदेड जिल्हा परिषदेचा  २२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण योजना समाविष्ट असून, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेवर विशेष भर दिला.  गेल्या अडीच वर्षात मिनल करनवाल यांनी नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत शिक्षण, आरोग्य तसेच पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि महिलांच्या सामाजिक व आर्थिक उत्थानासाठी विविध योजना राबविल्या आहेत. बालिका पंचायत हा त्यांचा अभिनव प्रयोग राष्ट्रीय स्तरावर गाजला. त्यांच्या या प्रयोगातून अनेक गावांमध्ये प्रशासकीय व पायाभूत सुविधांना गती मिळाली तसेच किशोर मुलींना पंचायत राज व्यवस्थेचे प्रशिक्षण मिळाले. नुकतीच त्यांनी बालिका पंचायत २.० नव्या टप्प्याची सुरुवात केली होती.


नव्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी किनवट येथे परिविक्षाधीन कालावधीत सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर एक वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत होत्या. त्यांनी किनवट सारख्या आदिवासीबहुल भागामध्ये शैक्षणिक सुधारणांवर विशेष भर दिला. आदिवासी समुदायाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सुधारणांसाठी विविध योजनांचा अंमल त्यांनी केला आहे.



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)