डोंबिवली \ शंकर जाधव : भाजपने राज्यभरात नवीन मंडळ अध्यक्षाची रविवारीमम निवड करण्यात केली. राज्यभरात १२०० हून अधिक जणांची मंडळ अध्यक्ष मपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ३५ ते ४५ वयोगट १०० बूथमध्ये एक अध्यक्ष असे असून दर तीन वर्षानी पक्षांतर्गत निवडणूक होत असते. कल्याणमध्ये पूर्वी ९ मंडळे होती, त्याची संख्या वाढून आता वीस मंडळे करण्यात आली आहेत.विशेष म्हणजे मंडळ अध्यक्षपदांसाठी युवांना प्राधन्य देण्यात आले आहे.
त्यात डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ विधानसभा या पाच विधानसभांचा समावेश आहे. त्यामध्ये डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्षपदी मितेश पेणकर, डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्षपदी पवन पाटील आणि प्रिया जोशी, कल्याण ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी मंदार टावरे, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी कर्ण जाधव, धनाजी पाटील, सुनिल म्हसकर, आशिष चौधरी, कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्षपदी अमित धाक्रस, स्वप्नील काठे, रितेश फडके, शक्तीवान भोईर,नवनाथ पाटील, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्षपदी मितेश म्हात्रे, विजय उपाध्याय, समीर भांडारी, संतोष शेलार आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात पूर्वेला विश्वजीत गुलाबराव कंरजुले, पश्चिमेला प्रजेश तेलंगे आणि लक्ष्मण पंत याची निवड करण्यात आली आहे.
माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी उपमहापौर राहूल दामले, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे यांच्या उपस्थितीत सर्व नियुक्ती जाहीर करण्यात आल्या. यावेळी मुकुंद(विशू)पेडणेकर,समीर चिटणीस, पूनम पाटील,प्रकाश पवार ,संदीप पुराणिक, मिहीर देसाई, रविसिंग ठाकूर,सूर्यकांत माळकर, लक्ष्मण पाटील, मनीषा राणे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.