'मु. पो. हेदूळ' या पुस्तकाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय वाड्मय पुरस्कार

  


मुंबई, दि. 21 एप्रिल (आरती परब)- यंग स्टार ट्रस्ट अध्यक्ष लोकनेते, आमदार हितेंद्र ठाकूर आयोजित साहित्य चावडीच्या उपक्रमातून उदयास आलेले लेखक, कवी विक्रांत शिवराम केसरकर यांच्या सुंदर माझे गाव "मु. पो. हेदूळ" या पुस्तकाची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय


मुंबई \ आरती परब : यंग स्टार ट्रस्ट अध्यक्ष, आमदार हितेंद्र ठाकूर आयोजित साहित्य चावडीच्या उपक्रमातून उदयास आलेले लेखक, कवी विक्रांत शिवराम केसरकर यांच्या सुंदर माझे गाव "मु. पो. हेदूळ" या पुस्तकाची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय
 वाड्मय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. तर हा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय वाड्मय पुरस्कार (मातंग साहित्य परिषद, महाराष्ट्र) ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि ज्येष्ठ साहित्यिक, न्यायाधीश सुनील वेदपाठक, नांदेड यांच्या हस्ते लेखक, कवी विक्रांत शिवराम केसरकर पुणे येथे प्रधान करण्यात आला.

हा या पुस्तकाला मिळालेला सातवा पुरस्कार असून या अगोदर स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेमार्फत राज्यस्तरीय स्व. राजाराम डाकवे (तात्या) पुरस्कार, फुलोरा साहित्यसेवा (कलेचे माहेर घर) संस्थेकडून साहित्य पुरस्कार सर्वद फाउंडेशन संस्थेकडून कवी कुसुमाग्रज साहित्य राज्यस्तरीय पुरस्कार, साहित्य कला विचार मंच, पालघर या संस्थेकडून लक्षवेधी अक्षर साधना उत्तेजनार्थ सन्मान पुरस्कार, मराठी वृतपत्र लेखक संघ, महाराष्ट्रराज्य, संस्थेकडून साहित्य भूषण पुरस्कार आणि सिंधुदुर्ग साहित्यरत्न २०२४ असे बहुमानाचे साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय वाड्मय पुरस्कारासाठी मातंग साहित्य परिषद, पुणे. महाराष्ट्र राज्य या संस्थेचा आणि संस्थेचे संस्थापक डॉ. धनंजय भिसे यांचे लेखक, कवी विक्रांत शिवराम केसरकर यांनी मनापासून आभार मानून साहित्य चावडीचे समन्वयक आजीव पाटील, चावडीचे आयोजक सुरेखा कुरकुरे, मधुकर तराळे, हरिश्चंद्र मिठबावकर व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यासाठी ऋणनिर्देश प्रकट केले. हा पुरस्कार मिळणे म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी अभिमानाची बाब आहे. एक मोठी जबाबदारी आहे. या पुरस्कारामुळे माझे मनोबल उंचावले असून मी अजून चांगले प्रभावी लिहिण्याचा प्रयत्न करेन आणि आई माऊली, आई करलाई देवीच्या आशीर्वादाने या पुरस्काराचा स्वीकार करतो असे विचार विक्रांत केसरकर यांनी मनोगतातून व्यक्त केले.




Post a Comment

Previous Post Next Post