डोंबिवली \ शंकर जाधव : भारतीय जनता पार्टी डोंबिवली पूर्व मंडळाच्या नवीन अध्यक्षपदी मितेश पेणकर यांची रविवारी पूर्व मंडळ कार्यालयात निवडणूक अधिकारी शशिकांत कांबळे यांनी घोषणा करण्यात आली.यावेळी माजी नगरसेवक राहुल दामले यासह नंदू जोशी, पूनम पाटील, संदीप पुराणिक, मिहीर देसाई, रविसिंग ठाकूर, सिद्धार्थ शिरोडकर, प्रकाश पवार, मावळते अध्यक्ष मुकुंद ( विशु) पेढणेकर आदी उपस्थित होते. ३५ ते ४५ वयोगट व १०० बूथ मध्ये एक अध्यक्ष असे असून दर तीन वर्षानी पक्षानतेगत निवडणूक होत असतात.
निवडणूक अधिकारी म्हणून कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुळं शशिकांत कांबळे व जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी हे होते.यावेळी नवीन अध्यक्षपदाकरता मितेश पेणकर यांचाएकच अर्ज दाखल झाला. उपस्थित निवडणूक अधिकारी यांनी यावेळी पेणकर यांची नवीन अध्यक्षपदी निवड म्हणून घोषणा केली.पेणकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर होताच उपस्थित माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेणकर यांना पेढे भरवून अभिनंदन केले.
यावेळी शशिकांत कांबळे म्हणाले, महाराष्ट्रातील ११९६ अध्यक्ष मंडळाची एकच वेळी निवडून पार पडली. भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात युवा नेतृत्व घडवण्यासाठी युवकांना मोठी संधी मिळाली. त्यांच्या नेतृत्वात तयार झालेला कट्टर भाजप कार्यकर्ता, प्रामाणिक, कर्तृत्ववान, एकनिष्ठ, तरुण तडफदार युवा नेतृत्व मितेश पेणकर यांची भाजप डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा आहेत. विशेष म्हणजे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष चव्हाण यांच्या तालमीत तयार झालेला हा पठ्या, युवा, वयाच्या ३८व्या वर्षी भाजपा डोंबिवली पूर्व मंडळाचे नेतृत्व करणार आहे हे वाखनण्याजोगे आहे. पक्षाचे प्रमाणिकपणे काम केल्याने हे फळ मिळाले आहे, यात काही शंकाच नाही.