बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मवर कुंपण!

 


अंबरनाथ \ अशोक नाईक : बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्म चर्चेत असताना, आता फलाट क्रमांक एक 'अ'हा फलाट क्रमांक एक म्हणून ओळखला जाणार असून फलाट क्रमांक एकवर कुंपण घालण्याचे काम करण्यात येणार आहे. बदलापूर रेल्वे प्रवाशांना गेली अनेक वर्षांपासून राजकारण्यांकडून होम प्लॅटफॉर्मचे आश्वासन देऊन मतांची बेरीज केली जात होती. आता या होम प्लॅटफॉर्मवर कुंपण घातले जाणार असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. 


बदलापूर रेल्वे स्थानक फलाट क्रमांक एक आता अस्तित्वात राहणार नाही. मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकात शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक घेतला आहे मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार 'रेल्वे अतिक्रमण नियंत्रण' उपायांचा एक भाग म्हणून बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर कुंपण घालण्याचे काम करण्यात येणार आहे. याकरिता फलाट क्रमांक एकवर रात्रीचा विशेष ब्लॉक घेतला जात आहे. हा ब्लॉग शनिवारी १९ एप्रिल आणि रविवारी २० एप्रिल रोजी रात्री बारा ते सहा वाजेपर्यंत ६ तासांचा असणार आहे. हा ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर बदलापूर येथील फलाट क्रमांक एक कायमचा बंद केला जाईल.



बदलापूर रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्मची उभारणी करण्यात आली असून फलाट क्रमांक एक आणि दोन हा संयुक्त फलाड असून येथे मुंबईकडे जाणाऱ्या आणि कर्जत खोपोली कडे जाणाऱ्या लोकल येत होत्या. या ठिकाणी एकाच वेळी दोन लोकल गाड्या आल्यावर फलाटावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती त्यामुळे या ठिकाणी होम फलाट उभारण्यात यावा अशी प्रवाशांची मागणी होती. त्यानुसार होम प्लॅटफॉर्म उभारण्यात आला. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वी अपूर्णावस्थेत असलेल्या या होम प्लॅटफॉर्मचे घाईत उद्घाटन करण्यात आले. रंगरंगोटीसह छप्पर शेडचे काम अजूनही सुरू आहे. दरम्यान आता या होम प्लॅटफॉर्मचे अस्तित्व कुंपणात बंद होणार असल्याची चर्चा रेल्वे प्रवाशांमध्ये होऊ लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post