अंबरनाथमध्ये ५०० चौरस फुटापर्यंत घरांना कर माफ करा

 




शिवसेनेने मुख्याधिकाऱ्यांची घेतली भेट


 अंबरनाथ/ अशोक नाईक : अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील ५०० चौरस फुटापर्यंत चटई क्षेत्र असलेल्या घरांना मालमत्ता कर सरसकट माफ करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली असून या मुद्द्यावरनगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना निवेदन पत्र दिले आहे. 


राज्य सरकारने फेब्रुवारी २०२२ मध्ये एक अध्यादेश काढला होता. राज्य सरकारने मुंबई,नवी मुंबई,ठाणे यासारख्या शहरांमध्ये उत्पन्नाचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा तेथील नागरिकांचे मालमत्ता कर सरसकट माफ करण्यात आलेले आहेत. त्याच धर्तीवर अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील ५०० चौरस फुटापर्यंत घरे असलेल्यांना मालमत्ता कर सरसकट माफ करण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदन पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अनिल भोईर यांनी दिली.


अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात मजूर, श्रमिकांची वस्ती आहे. मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी परिसर आहे. कोरोना काळात नोकरी, फेरीवाल्यांचे रोजगार गेले आहेत. आर्थिक घसरण लागली आहे. अंबरनाथमध्ये ८० टक्के नागरिक एमआयडीसीमधील छोट्या कारखान्यांत व हातगाडीवर आपली उपजीविका करत आहेत. या सर्वांची बेताची परिस्थिती आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे धर्तीवर ५०० चौरस फुटांपर्यंत घरांचा मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post