डोंबिवली \ शंकर जाधव : शिवसेना वैद्यकीत मदत शिबीर आणि माजी सरपंच तथा कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख जयंता पाटील यांच्या वतीने श्रीरामनवमीला आजदे पाडा येथील जनसंपर्क कार्यालयासमोर मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे, युवा सेना कल्याण जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील, महिला पदाधिकारी कविता गावंड,ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ पाटील यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिबिराला भेट दिली. शिबिरात हृदय रोग तपासणी, नेत्र तपासणी, इसीजी तपासणी, मधुमेह तपासणी करण्यात आली.
यावेळी माजी सरपंच तथा कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख जयंता पाटील म्हणाले,आजच्या महागाईच्या काळात आरोग्य तपासणी करण्यासाठी रुग्णालयात जाताना नागरिकांना खर्च परवडणारा नसतो.आजदेपाडा येथे नागरिकांकरता मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते.
