पश्चिम रेल्वेवर १९–२० एप्रिल दरम्यान ब्लॉक
मुंबई : चर्चगेट आणि मरीन लाइन्स स्थानकांदरम्यान असलेल्या वानखेडे फूट ओव्हर ब्रिजच्या (दक्षिण) मुख्य गर्डर्सच्या लाँचिंगसाठी पश्चिम रेल्वे १९ एप्रिलच्या रात्रीपासून २० एप्रिलच्या पहाटेपर्यंत (शनिवार–रविवार) तीन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रात्री १:१५ ते पहाटे ४:१५ दरम्यान राहील.
या कामामुळे सात लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. १९ एप्रिल रोजी रात्री ८:५० वाजता बोरीवलीहून सुटणारी चर्चगेट लोकल आणि २० एप्रिल रोजी सकाळी ४:३८ वाजता चर्चगेटहून सुटणारी बोरीवली लोकल या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. २० एप्रिल रोजी पहाटे १२:१० वाजता बोरीवलीहून सुटणारी चर्चगेट लोकल, रात्री ११:४९ वाजता विरारहून सुटणारी लोकल, १२:३० वाजता बोरीवलीहून सुटणारी लोकल आणि १२:०५ वाजता विरारहून सुटणारी लोकल – या चार गाड्या चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रल येथेच थांबतील.
चर्चगेटहून २० एप्रिल रोजी सकाळी ४:१५ वाजता सुटणारी पहिली विरार लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या मार्गावर रद्द राहील आणि ती थेट मुंबई सेंट्रलहून ४:२५ वाजता सुटेल याच दिवशी सकाळी ४:१८ वाजता सुटणारी चर्चगेट–बोरीवली लोकलसुद्धा चर्चगेट–मुंबई सेंट्रल दरम्यान रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, १९ एप्रिल रोजी रात्री ११:३० वाजता विरारहून निघणारी चर्चगेट लोकल वेळेनुसार १:१० वाजता चर्चगेटला पोहोचणार आहे. ही ट्रेन ब्लॉक सुरू होण्यापूर्वी चर्चगेटला पोहोचणारी शेवटची लोकल असेल.