ठाकरेंच्या शिवसेना महिलांनी रस्त्यावर चुलीवर भाजल्या भाकऱ्या
डोंबिवली \ शंकर जाधव : वाढती महागाईने जनता त्रस्त झाली असताना विरोधी पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे पक्षाने सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. घरगुती सिलेंडरची किंमत ५० रुपयांनी वाढल्याने 'गॅस सिलिडर को चूलच बरी'असे म्हणत महिलांनी रस्त्यावर चूल करून भाकऱ्या भाजल्या. ठाकरेंच्या शिवसेनेने डोंबिवली पश्चिमेला स्टेशनबाहेर केलेले आंदोलन पाहून नागरिकही सहभागी झाले होते.
या आंदोलनात शिवसेना डोंबिवली (पश्चिम) शहरप्रमुख प्रकाशभाऊ तेलगोटे, उपशहर प्रमुख सुरज पवार, संजय पाटील, सुरेश परदेशी, शाम चौगले, प्रमोद कांबळे, नितीन पवार, राजेंद्र सावंत, सुनील पवार, अंकुश सूर्यवंशी, सुप्रिया चव्हाण, प्रियंका विचारे, अनिल मुथा, सुरेखा सावंत, अर्चना पाटील, रश्मी कांबळे, सानिका खाडे, सायली जगताप, दांडगे नीलिमा, विश्वासराव, रेश्मा सावंत, भाग्यश्री चव्हाण आदींसह नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी उपशहर प्रमुख सुरज पवार म्हणाले, आताच्या सरकारने जनतेला दिलासा मिळेल असा तोडगा महागाई काढणे गरजेचे आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकार जर वाढत्या महागाईवर काहीही करत नसतील तर जनतेने त्यांना का म्हणून पुन्हा निवडून दयायचे. विरोधी पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा जनतेचा आवाज आहे. जनतेला त्रास देणारे व महागाईवर अंकुश ठेवू न शकणारे हे सरकार नको.