हाशमी जाफर हुसैन जाफरीला एमडीसह अटक

 


कल्याणमध्ये खडकपाडा पोलिसांची कारवाई 

डोंबिवली \ शंकर जाधव : कल्याण यांच्या विशेष कारवाई पथक आणि खडकपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने संयुक्त कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराकडून १५ ग्रॅम ‘मेफेड्रोन (एमडी)’ हा अंमली पदार्थ हस्तगत केला. अटक आरोपी इराणी टोळीशी संबंधित असून याआधीही त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, हाशमी जाफर हुसैन जाफरी (वय ३३, रा. इराणी नगर, आटाळी, कल्याण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी कलम ३९४, ३०७, ३५३, मोक्का अशा गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. बुधवारी सायंकाळी सव्वा वाजण्याच्या पोलीस पथक गस्ती बंदरपाडा परिसरातील शिवमंदिर रोडवर गेले होते. स्कुटीवर आलेल्या हाशमीचा संशय आला. हाशिमची झडती घेतले होते असता त्याच्याकडून अंदाजे ३०,००० रुपये किंमतीचा १५ ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस उपायुक्त अतुल शेंडे, सहाय्यक आयुक्त कल्याणजी घेटे, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.




Post a Comment

Previous Post Next Post