अंबरनाथ / अशोक नाईक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि जोशी काका- रामदास पाटील रिक्षा चालक-मालक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे आयोजन- नियोजन संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सल्लागार आयुष्यमान नाना घेगडमल यांनी केले.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आनंद दांडगे आणि आदर्श महिला विकास केंद्राच्या अध्यक्ष व समाजसेविका आयुष्यमती निर्मलाताई घेगडमल यांनी बुद्ध वंदना व भीम वंदनाने केली. सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.
बुद्ध वंदना झाल्यानंतर सर्व पाहुणे व वक्ते तसेच संघटनेचे सर्व सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमान बालाजी भालेराव संघटनेचे कार्याध्यक्ष यांनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना आयुष्यमान अनिल कांबळे यांनी मांडली. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात शाहीर शीतल भंडारे व त्यांचे सहकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाची महती गाऊन सादरीकरण केले. त्यांचेही स्वागत पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून हायकोर्टाचे नामांकित अॅड. रविकिरण सुरेश खैरे यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी भारतीय समाजातील विकृतींना आव्हान देत समतेवर आधारित समाजव्यवस्था उभारली आणि संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना हक्कांची जाणीव करून दिली.
प्र. द्वा. कारखानीस महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. शुभांगी केदारे यांनी स्त्री शिक्षणासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, आज स्त्रियांना जो सन्मान प्राप्त झाला आहे, त्याचे श्रेय फक्त बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला जाते.
इतिहास विभाग प्रमुख डॉ. आनंद दांडगे यांनी समतामूलक समाजाच्या संकल्पनेवर भर दिला. त्यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात केला पाहिजे. त्यांनी पालकांना आणि रिक्षाचालक-मालक संघटनेला आवाहन केले की आपल्या मुलांना शिक्षण द्या, हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे. कार्यक्रमात आयुष्यमान विशाल के. माघाडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाला अंबरनाथ (पूर्व) पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील आणि ट्रॅफिक निरीक्षक पुराणिक हेही उपस्थित होते.यावेळी प्र. द्वा. कारखानीस महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. कटारे मॅडम आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी आयुष्यमान मुरलीधर माने हेही उपस्थित होते. या दोघांचेही शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
श्रावस्ती महिला लेझीम पथकाने गोडबोले मॅडम आणि सीमा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आकर्षक लेझीम नृत्य सादर केले आणि बाबासाहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. संघटनेच्या वतीने कार्यक्रमस्थळी सर्व नागरिकांसाठी पाण्याचे वाटप करण्यात आले, तसेच अल्पोपहार व गोड बुंदीचे लाडू वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमास आयुष्यमान अनिल कांबळे (अध्यक्ष), सुनील कांबळे (उपाध्यक्ष), उमेश हिवराळे (सचिव), बाबू अण्णा सिनिरप्पा (सहसचिव), मारुती कांबळे (खजिनदार), दत्तात्रय सुरते (उपखजिनदार), नाना घे गडमल (सल्लागार), आयुष्यमान दिनेश दुबे ( सल्लागार),बालाजी भालेराव (कार्याध्यक्ष) , आयुष्यमान कैलास डोंगरे संघटक आणि जोशी काका रामदास पाटील रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष श्री. मिलिंद रामदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्वांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्यांनी अथक मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. शुभांगी केदारे आणि डॉ. आनंद दांडगे यांनी उपस्थितांना आवाहन केले की, उच्च शिक्षणासाठी कोणत्याही मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास त्यांनी थेट महाविद्यालयाशी संपर्क साधावा.