कल्याण ते सीएसटी दरम्यान घडला प्रकार
डोंबिवली \ शंकर जाधव : लोकल ट्रेनमधील एका माल डब्यात एक नशेखोर नशा करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कल्याण ते सीएसटी रेल्वे स्थानकादरम्यानचा जुना असून स्टेशनमध्ये व लोकलमध्ये नशा करताना कोणीही दिसल्यास कारवाई करावी, असे आदेश पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले असल्याचे डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वपोनि किरण उंदरे यांनी सांगितले. ट्रेनमधील हा व्हिडिओ एका प्रवाशाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला असून व्हायरल होत आहे.