दिवा व्यापारी संघटनेची घोषणा
दिवा \ आरती परब : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ दिव्यातील सर्व व्यापाऱ्यांनी आज दिवा बंदची हाक दिली आहे.
आज २५ एप्रिलला सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दिव्यातील सर्व दुकाने बंद राहतील अशी माहिती व्यापारी असोसिएशन यांनी दिली. तसेच पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मृत झालेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व व्यापारी वर्गाला आणि नागरिकांनी एकजुटीने एकत्रीत उद्या सकाळी १०.१५ वाजता हरिओम ज्वेलर्स, साजन ज्वेलर्स, सूरज स्टीलसमोर, बीआर नगर दिवा, आगासन रोड दिवा, येथे उपस्थित राहण्याचे आवाहन व्यापारी संघटनेने केले आहे.