दिवा मनसेकडून पेढे वाटून आंदोत्सव
दिवा \ आरती परब : राज्यात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने आणि आंदोलने करण्यात आली होती.
राज्यातील विविध संघटनांनी देखील या हिंदी सक्तीच्या विरोधात भूमिका घेतली होती. अखेर वाढता विरोध पाहता राज्य शासनाने हा निर्णय स्थगित केला आहे. दिव्यातील महाराष्ट्र सैनिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून दिवा रेल्वे स्टेशन येथे पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत केले आहे.