ठाण्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत आरोग्य तपासणी शिबीर



ठाणे : मुख्यमंत्री सचिवालय व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

या प्रसंगी आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहराध्यक्ष  संदीप लेले, माजी नगरसेवक भरत चव्हाण, संजय वाघुले, ओमकार चव्हाण तसेच भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


या आरोग्य शिबिरात कोपरी परिसरातील नागरिकांना विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या व वैद्यकीय सेवा मोफत प्रदान करण्यात आल्या. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.

शिबिराच्या आयोजनामागील उद्देश नागरिकांपर्यंत दर्जेदार व मोफत वैद्यकीय सुविधा पोहोचविणे हा होता. विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्व तपासण्या करण्यात आल्या. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले असून अशा प्रकारची उपक्रमशीलता वारंवार व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.







Post a Comment

Previous Post Next Post