अकरावी प्रवेश प्रक्रिया आता २१ मेपासून सुरू होणार

 


मुंबई : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला अखेर २१ मेपासून अधिकृत सुरुवात होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यंदाही ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच राबविण्यात येणार असून, विद्यार्थी आणि पालकांनी https://11thadmission.org.in आणि https://mahafyjcadmissions.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.

या आधी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी १९मे ची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र नंतर संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रिया सुरू नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर संकेतस्थळावर १९ ते २० मेपर्यंत केवळ सरावासाठी प्रवेश प्रक्रिया खुली करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.  तसेच खऱ्या प्रवेश प्रक्रियेला २१ मेपासून सुरुवात होणार असून ती २८ मेपर्यंत असणार आहे. 

प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वत:ची माहिती भरून अर्ज सादर करणे. यामध्ये मार्कशीट, जात प्रमाणपत्र (असल्यास), रहिवासी दाखला, तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची सॉफ्टकॉपी अपलोड करावी लागेल.

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा विभागीय ऑनलाइन प्रवेश क्षेत्रांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये सहाय्यता केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

शिक्षण विभागाने प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक दिले आहेत. तसेच वेबसाइटवरून FAQ विभाग आणि लाईव्ह चॅट सपोर्टचीही सुविधा दिली आहे.






Post a Comment

Previous Post Next Post