नीरज चोप्रा आणि ऑडी इंडिया यांच्यात भागीदारी


मुंबई :  भारताचे सुप्रसिद्ध भालाफेकपटू व ऑलिम्पिक सुवर्ण-पदक विजेते नीरज चोप्रा यांनी जर्मनीतील नामवंत वाहन कंपनी ऑडी इंडियासोबत औपचारिक भागीदारी जाहीर केली आहे.

नीरज चोप्रा यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक यश मिळवत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर जागतिक स्पर्धांमधील सातत्यपूर्ण कामगिरीतून त्यांनी आपल्या अष्टपैलू क्षमतेची छाप सोडली आहे. त्यांच्या या प्रवासात ऑडी इंडियासोबतची नव्याने जुळलेली ही साथ, "सर्वोत्तमतेचा पाठपुरावा" या मूल्यावर आधारित आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों यांनी या भागीदारीबद्दल सांगितले, “नीरज केवळ एक खेळाडू नाहीत, तर कठोर परिश्रम, आत्मनिष्ठा आणि प्रगतीशीलतेचं प्रतीक आहेत. हेच मूल्य ऑडीच्या डीएनएमध्येही खोलवर रुजलेलं आहे. त्यामुळे नीरजसारख्या खेळाडूसोबत काम करण्याची संधी ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे.”

नीरज चोप्रा यांनी देखील या नव्या प्रवासाबद्दल समाधान व्यक्त करत म्हटलं, “ऑडी ही कार ब्रँड म्हणून माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे – ती केवळ लक्झरीची नाही, तर गुणवत्तेची ओळख आहे. एक अ‍ॅथलीट म्हणून मला सातत्याने उत्तमतेकडे वाटचाल करायची असते, आणि त्याच ध्येयासाठी ऑडीसारख्या ब्रँडसोबत असलेली भागीदारी प्रेरणादायक आहे.”

ही भागीदारी केवळ जाहिरातसदृश न राहता, भारतीय क्रीडा संस्कृतीच्या जागतिक पातळीवरील उभारणीसाठी एक सकारात्मक पाऊल ठरते. जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सचे व्यावसायिक प्रमुख करण यादव यांनी सांगितले, “नीरज आणि ऑडी यांच्यातील संबंध हा भारतीय क्रीडाजगतातील महत्त्वाचा टप्पा आहे. या सहकार्याची क्षमता प्रचंड आहे.”

नीरज चोप्रा यांनी एशियन गेम्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप व पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये आपल्या कौशल्याने भारतासाठी पदकांची शृंखला जोडली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post