सर्वेक्षण समितीचा सकारात्मक अहवाल
कोल्हापूर \ शेखर धोंगडे : बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत कोल्हापूर बस स्थानकावर आज सर्वेक्षणाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडला. सर्वेक्षण पथकाने बस स्थानक आगाराची स्वच्छता, सुशोभीकरण, तसेच प्रवासी सुविधांची पाहणी करून मूल्यांकन केले.
मूल्यांकन समितीमध्ये उपमहाव्यवस्थापक अनघा बारटक्के, प्रादेशिक अभियंता अशोक पन्हाळकर, ज्येष्ठ पत्रकार अजय केळकर, प्रवासी मित्र सोमनाथ कुंभार यांचा समावेश होता.
यावेळी यंत्र अभियंता यशवंत कानतोडे, आगार व्यवस्थापक अनिल मेहत्तर व प्रमोद तेलवेकर, पालक अधिकारी संतोष बोगरे, मल्लेश विभूते, संकेत जोशी, विजय निगडे, दीपक घारगे, शेखर सुर्वे, अमित तावडे उपस्थित होते.
बस स्थानकाच्या स्वच्छता व सुशोभीकरणावर समितीकडून समाधान व्यक्त करण्यात आले. तथापि, वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन या सुविधांची वाढ कशी होईल, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना समितीने दिल्या.